ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Viral | बाप रे! पालघरमध्ये होतोय चक्क भुताचा व्हिडिओ व्हायरल; विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ

Viral | तशी तर सर्वांनची भुताचं नुसतं नाव जरी काढलं तरी घाबरगुंडी उडते. तर मग असाच एक अंगाचा थरकाप उडवणारा भुताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच रस्त्यालगत फुटपाथ वर झोपलेला तरुण, वारंवार हवेत उडणारी खुर्ची, तर कोणीही बसलेलं नसतानाही आपोआप चालणारी सायकल आणि छतावर सफेद पोशाख परिधान करून चालणारी महिला असा हा प्रकार ह्या सीसीटीव्हीत कैद झाला असून तसेच या व्हायरल व्हिडिओतून (video) भूत असल्याचं भासवण्यात येत आहे.

तसेच हा व्हिडिओ पालघर शहरातील कचेरी रोड परिसरातील असल्याचा दावा देखील केला जात आहे. खर तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठया प्रमाणात व्हायरल झाला आहे. परंतु सध्या याच व्हिडिओची (video) जोरदार चर्चा देखील चालू आहे.

वाचा: सितरंग चक्रीवादळाचा कहर सुरूचं! बांगलादेशात 11 जणांचा मृत्यू; भारतातील ‘या’ 7 राज्यांना हाय अलर्ट

काय आहे त्या व्हिडिओत?

तसेच पाच ते सहा मिनिट सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या या व्हिडीओमध्ये (video) कोणीही बसलेलं नसताना देखील रस्त्याने चालणारी तीन चाकी सायकल दिसत आहे. तसेच थोड्यावेळानंतर दुकानाच्या छतावर पांढरा पोशाख परिधान केलेली तरुणी ये जा करताना दिसत आहेत. तर छतावर तरुणीच्या काही हालचाली सुरू असतानाच खाली असलेला एक प्लास्टिकचा स्टूल हा अचानक हवेत उडू लागल्याच यात दिसून येत आहे. बरं हे होत नाही तेच दुकानासमोर झोपलेल्या सुरक्षारक्षकाची पाण्याची बाटली देखील फेकली जाते. तर काही वेळानंतर या सुरक्षारक्षकाला खाली आथरलेल्या चादरीनेच गुंडाळून मारण्याचा प्रयत्न केला जात आहे

वाचा: आज सूर्यग्रहणादिवशी चुकुनही करू नका ‘ही’ कामे; अन्यथा घरादाराला भोगावे लागतील दुष्परिणाम, जाणून घ्या वेळ

काय आहे त्या व्हिडिओ मागच सत्य?

पण मात्र हा संपूर्ण व्हिडिओ (video) पाहिल्यानंतर हा सर्व खोडसाळपणा असल्याच स्पष्ट होत आहे. तसेच या व्हिडिओत रात्री रस्त्या लगत झोपलेला एक तरुण त्याच्या पोशाखावरून रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर झोपणाऱ्या प्रमाणे वाटत नाही. तसंच त्याच्या पेहरावावरून तो सुशिक्षित आणि आर्थिक सक्षम देखील वाटतोय. एवढंच नाही तर व्हिडीओच्या शेवटी या झोपलेल्या तरुणाच्या अंगावर अचानक चादर गुंडाळली जाते. तसेच या सगळ्या प्रकारामुळे भीती निर्माण झाल्याने पळून जाणारा तरुण हा देखील निव्वळ देखावा करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहेय. तसेच हा व्हिडिओ (video) कुठला आहे याची अजूनही कुठलीही स्पष्टता झाली नसली तरी देखील काही खोडसाळ तरुणांनी मनोरंजनाच्या दृष्टीने हा सीसीटीव्ही व्हिडिओ (video) तयार केल्याचं दिसून येत आहे. पण मात्र लोकांच्या मनात भीती निर्माण होण्याआधीच पालघर पोलिसांनी चौकशी करून सत्यता बाहेर आणावी अशी मागणी ही समाज माध्यमांनकडे केली जात आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Viral video of ‘this’ ghost happening in Palghar; So what is this video about? Know the truth behind this video;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button