ताज्या बातम्या

राज्यातील ९९ गावांना मिळाले मिळकत पत्रिका; पहा काय फायदे आहेत प्रॉपर्टी कार्डचे?

99 villages in the state received income cards; See what are the benefits of a property card?

राष्ट्रीय पंचायती राज(Rashtriya Panchayati Raj) दिवसाचे औचित्य साधून ऑनलाइन मिळकत पत्रिका वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या ऑनलाईन कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राज्यातील 99 गावांमधील 13500 मिळकत धारकांना ऑनलाइन मिळकत पत्रिका(Property card) प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमाच्या वेळेस राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.

हेही वाचा:
आरोग्यदायक किवी किती लाभदायक आहे पहा

आधुनिक तंत्रज्ञानाच्या (modern technology) साह्याने जमीन मोजणी व गावठाण मोजणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता.आणि मोजमाप ही अचूकतेने होते. हे एक डीजी इंडिया डिजिटलायझेशन( Digital India) च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल समजले जाते.पूर्वी महिनाभर चालणारी प्रक्रिया ही आता कित्येक तासांमध्ये पूर्ण होत आहे. आतापर्यंत 205 गावातील 27 हजार 217 धारकांना ही ऑनलाइन पत्रिका मिळाली आहे असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली.

हेही वाचा: आता कोंबडी शिवाय ही उबावणार पिल्ले पहा कोणते आहे हे यंत्र

या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यातील साठ गावांची चौकशी पूर्ण झालेली आहे. यामध्ये हवेली, पुरंदर ,दौंड व इंदापूर या तालुक्यांमध्ये ड्रोन द्वारे ( via dron) नगरभूमापन अंतर्गत मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी मालकी हक्काची चौकशी सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील कोंढणपूर गावातील शेतकरी विश्वनाथ मुजमुले यांना पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाइन पत्रिका मिळण्याचा मान मिळाला होता.

स्वामित्व योजनेमुळे(Because of the ownership plan) नागरिकांची पत वाढणार असुन नागरिकांना मालकी हक्काचा पुरावा मिळणार आहे. तसेच प्रत्येक मिळकत धारकांना विविध प्रकारचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा:“पंतप्रधान किसान निधी” (Prime Minister’s Farmers Fund) चा आठवा हप्ता येणार “ह्या” महिन्यात…

१.प्रत्येक धारकाच्या जागेचा नकाशा (Map) तयार होईल व सीमा निश्चीत होऊन मिळकतीचे नेमके क्षेत्र माहित होईल.

२.प्रत्येक धारकाला आपल्या मिळकतीच्या मालकी हक्का संबंधी मिळकत पत्रिका व सनद मिळेल.

३.मिळकत पत्रिकेआधारे संबधित धारकास बँक कर्ज उपलब्ध होऊ शकते, तारण करता येईल,जामिनदार राहता येईल. तसेच विविध आवास योजनांचे लाभ घेता येतील.

४.बांधकाम परवानगीसाठी (.For building permission) मिळकत पत्रिका आवश्यक आहे.

५.सीमा माहित असल्यामुळे धारकास मिळकतीचे संरक्षण करता येईल.

हेही वाचाउद्यापासून अठरा वर्षाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण: नोंदणी असेल बंधनकारक, लसीकरणासाठी नोंदणी कशी कराल?

६.मालकी हक्काबाबत(.Concerning ownership ) व हद्दीबाबत निर्माण होणारे वाद संपुष्टात आणण्यास मदत होईल व मिळकतीचे वाद कमी उद्भवतील.

७.मिळकतीसंबधी बाजारपेठेमध्ये (In the market) तरलता येऊन नागरिकांची आर्थिक पत उंचावेल.

हेही वाचा:
१) आरोग्यदायक किवी किती लाभदायक आहे पहा

२) आता कोंबडी शिवाय ही उबावणार पिल्ले पहा कोणते आहे हे यंत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button