Tractor Yojana | शेतकऱ्यांना शेती करताना सर्वाधिक गरज भासते टी ट्रॅक्टरची. कारण त्याशिवाय मशागत होतच नाही. आज शेतातील (Agriculture) मेहनतीसाठी भरमसाठ पैसे घेतले जातात. जे शेतकऱ्यांना परवडत नाही. म्हणूनच ट्रॅक्टर योजना राबवली जाते. तुम्हीही ट्रॅक्टर (Tractor Subsidy) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
कारण आता ट्रॅक्टर खरेदीवर तब्बल 90 टक्के अनुदानावर (Subsidy) अर्ज सुरू करण्यात आले आहेत. ज्याचा शेतकऱ्यांना (Department of Agriculture) चांगला लाभ मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक (Financial) बचत देखील मिळणार आहे. स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर घरी आणल्यावर शेतकऱ्यांना मेहनतीवर केला जाणारा खर्च देखील कमी होणार आहे.
वाचा: आनंदाची बातमी! आता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?
मिनी ट्रॅक्टर अनुदान
समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून स्वसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर (Subsidy) मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने दिली जातात. याच संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील स्वसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Subsidy) व त्याच्या उपसाधनांसाठी 90 टक्के अनुदानावर अर्ज सुरू झाले आहेत. हे अर्ज 30 नोव्हेंबरपर्यंत करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना (Type of Agriculture) करण्यात आले आहे.
योजनेच्या अटी
• लाभार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावा.
• स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावा.
• स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील असावा.
• स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बॅकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे. त्यानंतर सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिवांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे लागतील.
• निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यतांना बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे.
• त्यांनी सदहू यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे (परिवहन अधिकारी) व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
वाचा: सामान्यांसाठी खुशखबर! ‘या’ रेशन कार्डधारकांना मिळणारं 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ, तेल आणि मीठ मोफत
कशाप्रकारे मिळेल अनुदान?
मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख एवढी आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या व प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वयहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु.3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटानी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जास्त अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल. त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रु. 3.15 लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाने स्वत: खर्च करावी.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील तब्बल 16 लाख शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई
- आज उडदाला काय दर मिळाला रे भाऊ? अरे मित्रा आपलं मी ई शेतकरी चॅनेल एका क्लिकवर देतंय ना शेतमालाचे ताजे बाजारभाव
Web Title: Good news for farmers! 90 percent subsidy is available for mini tractors Apply by date