कृषी बातम्या

“या” तारखेपासून ७/१२ मिळणार घरपोच मोफत; शासन निर्णय जाहीर, वाचा सविस्तर..

7/12 will be free from this date; Government decision announced, read detailed ..

भारत हा कृषिप्रधान (Agricultural) देश असून, देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये आजपर्यंत शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांसाठी (With agriculture) दिलासादायक बातमी आहे. शासन निर्णय (government rulling) काल १ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आला. शासन निर्णयाच्या माध्यमातून येणाऱ्या गांधी जयंती (२ ऑक्टोंबर २०२१) पासून देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाचं निमित्ताने घरपोच मोफत ७/१२ दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. १ ऑगस्ट २०२१ पासून राज्यातील नवीन स्वरूपातील ७/१२ उपलब्ध करून देण्यात आला. हा सातबारा तलाठ्याच्या माध्यमातून शेतकर्यांना घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वाचा: शेतजमिनीच्या 7/12 मध्ये झाले हे मोठे 11 बदल, जाणून घ्या कोणकोणते बदल केले आहेत.

शासन निर्णय –

1) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त डिजिटल भूमी अभिलेख आधुनिकरण कार्यक्रम इ महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अज्ञावालीमध्ये संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणार्या अधिकार अभिलेख विषयक गा.न.नं. ७/१२ अद्यावत उताऱ्यात प्रती गावामध्ये सबंधित तलाठ्यामार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जावून मोफत देण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविण्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता , १९६६ आणि त्या खालील नियम या अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारात याद्वारे शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

२) सदर मोहिमेचा प्रारंभ दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२१ रोजी (महात्मा गांधी जयंती) करण्यात यावा.

३) यासाठी सर्व संबधितांना आवश्यक ते तांत्रिक सहाय्य पुरविण्याची जबाबदारी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची राहील.

वाचा: खरिपात “या” पिकांना चांगला भाव; फक्त 60 ते 70 दिवसांच्या पिकामध्ये मिळवा दुप्पट उत्पन्न, करा “या” दिवसात लागवड

वाचा: पुढचे 5 दिवस “या” पिकांची अशी घ्या काळजी; अन्यथा नुकसानास बळी पडाल..

४) सदर गा.न.नं. ७/१२ अद्यावत उतार्याच्या प्रती उपलब्ध करून देण्यासाठी येणारा खर्च हा जिल्हा सेतू समितीकडील निधीमधून उपलब्ध करून देण्यात यावा आणि त्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हाधिकारी यांची राहील.

५ ) स्वतंत्याच्या अमृत महोत्सवी वर्ष २०२१-२०२२ निम्मित्ताने राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहीमेअंतर्गत वरीलप्रमाणे गा.न.नं.७/१२ उताऱ्याची अद्यावत प्रत एका खातेदारास फक्त एकदाच मोफत उपलब्ध करून द्यावी.

६) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०९०११६२४३८८६९९ हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button