Fact Check | केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना देणारं 6 हजार, मग शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार का 12 हजार?
Fact Check | केंद्र सरकारकडून पिएम किसान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिएम किसान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. शेतकऱ्यांना (Agriculture) या योजनेंतर्गत 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. म्हणजेच 4 महिन्याच्या अंतरावर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता केंद्राच्या या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील मुख्यमंत्री किसान योजना (CM Kisan Yojana) सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. मग शेतकऱ्यांना वर्षाला दोन्ही योजनांचे 12 हजार रुपये मिळणार का? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
वाचा: कापूस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! मुहूर्तालाच कापसाला मिळणार ‘इतका’ भाव
व्हायरल बातम्यांमध्ये कितपत तथ्य…
पिएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री किसान योजना चालू करण्यात येणार आहे. अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. मात्र या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे. हे जाणून घेण्याचं प्रयत्न करूया. यासंदर्भात महाराष्ट्राचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासोबत माध्यमांनी चर्चा केल्यास ते म्हणाले की, “या संदर्भात मला काही माहिती नाही. मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्रीच याबद्दल सांगू शकतील.” त्याचबरोबर कृषी विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, “हा एक धोरणात्मक निर्णय आहे. तो मंत्रालय स्तरावर घेतला जातो. त्याबाबत आम्हाला काही सांगता येणार नाही.”
वाचा: शेतकऱ्यांनो ‘या’ भागात कोसळणार विजांसह पाऊस, पिकाची काळजी घेण्यासाठी वाचा महत्वपूर्ण कृषी सल्ला
काय म्हणाले कृषी अधिकारी?
मुख्यमंत्री किसान योजनेचे निकष ठरवण्याकरता
स्थानिक कृषी विभागांना यासंबंधीत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. असेही सांगण्यात आले आहे. यांदर्भात औरंगाबादचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख म्हणाले की, “सीएम किसान योजनेबाबत अद्याप तरी शासन स्तरावर काही निर्णय झालेला नाहीये. आम्हालाही शासनाकडून काही प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मिळालेले नाहीयेत. मात्र, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये द्यायचं ठरवलं, तर आपल्याकडे पीएम किसान सन्मान निधीचा डेटाबेस आहे. त्यावरून पात्र शेतकऱ्यांना मदत वितरित करू शकतो.”
शेतकऱ्यांना मिळणार का वर्षाला 12 हजार?
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून मुख्यमंत्री किसान योजना सुरू केल्यास शेतकऱ्यांना या योजनेचे 6 हजार रुपये मिळतील. मुख्यमंत्री किसान योजना सुरू झाली, तर या दोन्ही योजनांचे पैसे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- तुम्हीही ‘या’पेक्षा जास्त व्यवहार रोखीत करत असाल तर सावधान! अन्यथा मिळेल इन्कम टॅक्सची नोटीस
- हवामान बदलण्यापूर्वीच ‘या’ मोबाईल ऍपवरून मिळणार माहिती, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा…
Web Title: Like the Centre, the state government also gives 6 thousand to the farmers, so will the farmers get 12 thousand per year?