lang="en-US"> 'या' जिल्ह्यासाठी मिळणार 600 कोटींचा निधी ; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाले '

‘या’ जिल्ह्यासाठी मिळणार 600 कोटींचा निधी ; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाले ‘आकड्यांचे’ निर्णय !

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीच्या दृकश्राव्य (Audio visual) प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा वार्षिक योजना 2021-22 या वर्षांसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या विकास कामांसाठी 700 कोटींचा निधी (Fund) प्राप्त झाला आहे.

जिल्हा वार्षिक योजना निधी २०२१-२२

या निधीमधील कोरोना व ग्रामपंचायत पोटनिवडणुक आचारसंहितांमुळे 234.55 कोटी निधी वितरीत करण्यात आला. सर्वसाधारण योजनेसाठी 5.25 कोटी, आदिवासी उपाय योजनेसाठी 1.47 कोटी आणि अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 1.65 कोटी रुपयांच्या पूर्वनियोजनास बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.आतापर्यंत विविध विकास कामांसाठी 297.21 कोटींचा निधी खर्च झाला असून उर्वरित निधी मार्च 2022 अखेर खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा वार्षिक योजना 2022-23

जिल्हा नियोजन समिती मार्फत राज्यस्तर बैठकीसाठी निधींचे आराखडे मंजूर करण्यात आले. 2022-23 साठी राज्य शासनाकडून (State Goverment) जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेकरीता 453.40 कोटी,आदिवासी विकास उपाययोजनांकरिता 47.52 कोटी रुपये तर अनुसूचित जाती उपययोजनांसाठी 144 कोटी रुपये एवढी मर्यादा कळविण्यात आली आहे. परंतु 18 जानेवारी ला होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत 600 कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात येणार आहे.
प्रामुख्याने ग्रामीण, जिल्हा रस्ते विकास, प्राथमिक शाळा बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र बांधकाम, रूग्णालयांसाठी औषधे, साधनसामग्री, नगरोत्थान, नागरी दलितेतर वस्ती सुधार, अंगणवाड्या बांधकामे, जनसुविधा आदी योजनांसाठी वाढीव मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 10 हजार किलोमीटरपर्यंतचे चांगले रस्ते पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे.

याशिवाय साई संस्थांच्या दहा कोटींचा तिढा आणि देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देणे यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

हे ही वाचा –

Exit mobile version