आरोग्य

एकाच कुटुंबातील 6 व्यक्ती चा मृत्यु; शेतात व घरी स्वतःला विजेच्या शॉक पासून कस वाचाल पहा सविस्तर मार्गदर्शन…

4 deaths in the same family; Read detailed instructions on how to protect yourself from electric shock in the field and at home ...

मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. एकाच कुटुंबामधील ६ जणांचा विजेचा शॉक लागून, दुर्देवी मृत्यू झाला होता. मुलगा पाण्याच्या टॅन्क सुरू करण्याकरिता टाकीत उतरला होता. अचानक त्याला शॉक लागला तो ओरडला त्याला वाचवण्यासाठी संपूर्ण कुटूंब त्याच्या मदतीसाठी धावले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पूर्ण कुटुंबाला शॉक लागून 6 जण जागीच मृत्यू पावले होते.

विजेपासून सावध व्हा.. पावसाळ्यात या घटनांना प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. कशी काळजी घेता येईल आपण पाहूया..

वाचा : मोबाईल चार्ज करताना कोणती काळजी घ्यावी? अन्यथा होईल मोबाईल बॅटरीचे नुकसान! वाचा सिम्पल ट्रिक्स…

विजेपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण कसे कराल?

1) पाणी साठविण्याच्या टाक्यांचे गज किंवा पाइप बाहेर निघालेले नसावेत तसेच विजा चमकत असताना वाहत्या पाण्याचा वापर नाही करायचा.

2) गॅस गिझर, शेगडी, गॅस सिलेंडरचे नॉब बंद करून ठेवले तर अति उत्तम.

3) शेगडी च्या केबल चेक करत राहा शॉर्ट सर्किट मुळे करंट लागू शकतो.

4) विजा चमकत असताना टीव्ही प्रक्षेपण नेहमीच अशा वेळी टीव्ही अँटिना फिरवायला गेल्याने व वीजेचा झटका करंट पावसाळ्यात लागू शकतो. यापासून सावध राहा.

5) मोटार केबल सर्किट झालेल्या नसाव्यात, छोट्या सर्किट मुळे मोठा अपघात होऊ शकतो.

वाचा : खबरदार! जुनी झाडे तोडल्यास होणार लाखो रुपयांचा दंड…

6) शेतकऱ्यांची शेतीमुळे कामे मोटार व मोटार टाटरवर असतात, मोटार केबल व टाटरला पावसाळ्यात पटकन हात लावू नका. लाकडाचा वापर करा लाकडाच्या साहाय्याने करंट कमी होतो .

7) शेतीवरच्या केबल्सपासून पावसाळ्यात शक्यतो लांब राहा.

8) घरात लाकडी फर्निचरचा शक्यतो वापर करणे उत्तम आहे.

9) विजा चमकतांना झाडांपासून लांब राहा. आपण झाडाखाली बचाव करण्यासाठी जातो पण मोठं संकट आपण स्वतः ओढूनघेत असतो.

10) आपल्या समोर कोणाला शॉक लागत असलेला पाहत असाल तर पटकन धावत जाऊ नका ,पहिले लाईट बंदकरा आणि दुसरा दुसरा पर्याय त्या व्यक्तीला हटवताना लाकडाचा वापर करा. अशा घटना जास्त प्रमाणात शेतकरी वर्गात होतात यांनी सावध राहिले पाहिजे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button