ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

ब्रेकिंग न्यूज! फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांना मिळणारं 50 हजार; जाणून घ्या केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Yojana | देशात मोठ मोठ्या व्यवसायिकांसोबतच छोटे व्यवसाय करणारे लोक देखील आहेत. जे आपला उदरनिर्वाह (Financial) करण्यासाठी हातगाडीवर भाजिविक्री करतात. मात्र, कोरोणा काळात यांचा व्यवसाय (Business) अक्षरशः बंद पडण्याची वेळ आली होती. अशा परिस्थितीत त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. मग अशा लोकांना (Agriculture) मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम स्वानिधी योजना (PM Swanidhi Yojana) नावाची योजना आणली. जेणेकरून या लोकांना आर्थिक सहाय्य मिळेल.

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत रोजगार सुरू करण्यासाठी 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज (Loan) हमीशिवाय दिले जाते. सरकारने ही योजना (Government Scheme) विशेषतः रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुरू केली आहे, ज्यांना कोरोना (Corona) महामारीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.

वाचा: बिग ब्रेकींग! आता हस्तलिखित जुने फेरफार बंद; कसे असतील नवे फेरफार? वाचा महत्वपूर्ण निर्देश

कर्जावर सबसिडी उपलब्ध
पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत, (PM Self Fund Scheme) सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी कर्ज देते. या अंतर्गत त्यांना 10 हजार रुपयांचे कर्ज मिळते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे सरकार कर्जावर (Bank Loan) सबसिडी देखील देते. कर्जाची परतफेड झाल्यावर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते.

बिग ब्रेकिंग! प्रोत्साहन अनुदाची दुसरी यादी ‘या’ तारखेला होणारं प्रकाशित; प्रशासनाने दिली माहिती

हमीशिवाय मिळतंय कर्ज
जर एखाद्या व्यक्तीने पीएम स्वानिधी योजनेंतर्गत पहिल्यांदा 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले आणि त्याने त्याची वेळेवर परतफेड केली. अशा परिस्थितीत तो दुसऱ्यांदा या योजनेअंतर्गत 20 हजार रुपयांचे कर्ज घेऊ शकतो. त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी तो पात्र ठरणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत कर्ज घेण्यासाठी कोणतीही हमी देण्याची गरज नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाची रक्कम तीन वेळा तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाते.

वाचा: ब्रेकींग! शेतकऱ्यांवर आता वीज दरवाढीचं मोठं संकट; युनिटामागं होणारं ‘इतक्या’ रुपयांची वाढ

कोणते व्यवसायिक करू शकतात अर्ज?
या योजनेच्या लाभासाठी फळविक्रेते, वडापावची गाडी, छोटे कपड्याचे दुकान, भाजोविक्रेते अशा प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय असलेल्या दुकानदारांना हे कर्ज देण्यात येणार आहे. या स्वानिधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपला अर्ज भरावा.

अर्ज कसा करायचा?
पीएम स्वानिधी योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत परत केली जाऊ शकते. तुम्ही दरमहा कर्जाची रक्कम हप्त्यांमध्ये परत करू शकता. पीएम स्वानिधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करता येतो. सरकारी बँकेत पीएम स्वानिधी योजनेचा फॉर्म भरा. तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स फॉर्मसोबत जोडावी लागेल. यानंतर, तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, कर्जाचा पहिला हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल.

आठ योजनांचा मिळतोय लाभ
टपरीधारक, फेरीवाले व हातगाडीवाल्यांच्या कुटुंबीयांनाही सरकार आठ योजंनाचा फायदा देत आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने कुटुंबीयांसाठी 8 योजना सुरू केल्यात. ज्यात जननी सुरक्षा योजना, वन नेशन वन कार्ड, पीएम जनधन योजना, पीएम जीवनज्योती विमा योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम श्रम योगी मानधन योजना, बीओसीडब्ल्यू मातृ वंदना योजना या आठ योजनांचा समावेश आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking news! 50,000 for hawkers and handcarts; Know the important decision of the central government

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button