ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

ब्रेकिंग न्यूज: राज्यात ‘या’ अभियानअंतर्गत 100 दिवसांत होणार 5 लाख घरे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Eknath Shinde | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2024 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, आता अमृत महा आवास योजना 2022-23 या मोहिमेत येत्या 100 दिवसांत 5 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. विक्रमी वेळेत घरे बांधली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश होणार आहे. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. यामुळे राज्यातील कित्येक नागरिकांना (Financial) स्वतःच छप्पर मिळणार आहे.

अमृत महाआवास अभियान
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ या राज्यस्तरीय शुभारंभ व पारितोषिक वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. राजाराम दिघे आणि राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वाचा: बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना सहज मिळणार पीक कर्ज; ‘ही’ जाचक अट रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

सर्वांना मिळणार घरे
मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वांना घरे देण्यासाठी राज्यात विविध योजना सुरू आहेत. त्यासाठी सर्वसामान्यांना समोर ठेवून जनहिताचे निर्णय घेतले जात आहेत. राज्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यामुळे ग्रामविकास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दर्जेदार व वेळेत घरे देण्यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करते तेव्हा राज्याचा विकास झपाट्याने होतो, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

वाचा: पांढऱ्या सोन्याला येणार अजून झळाळी! बाजारात ओस पडल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात

बेघरमुक्त महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये ग्रामीण विकास यंत्रणेने अतिशय चांगले काम केले आहे. अमृत ​​महाआवास योजनेअंतर्गत मार्च 2023 पर्यंत 5 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआवास योजनेच्या निकषात बसत नसलेल्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी नवीन योजना तयार करून ‘बेघरमुक्त महाराष्ट्र’ करण्याची घोषणा केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या हस्ते अमृत महाआवास पुरस्कार 2023 च्या पुस्तिकेचे, अभियानाच्या पोस्टर्स, महाआवास त्रैमासिक आणि अभियान गौरव गाथेचे प्रकाशन करण्यात आले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: 5 lakh houses will be built in 100 days under campaign in the state; Launched by the Chief Minister

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button