ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

रुफटॉप सौर योजना यंत्रणेवर 40 टक्के अनुदान; वीज ग्राहकांना कसा घेता येईल लाभ? वाचा सविस्तर

40 percent subsidy on rooftop solar planning system; How can electricity consumers benefit? Read detailed

महावितरणच्या गटातील लोकांसाठी म्हणजेच घरगुती गृहनिर्माण रहिवासी संस्था (Housing Residential Association) व निवासी कल्याणकारी संघटना या ग्राहकांसाठी केंद्रशासनाने (Central Government) एक यंत्रणा आणली आहे. छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा (Energy generation system) बसवणार आहेत यासाठी 40 टक्क्यांहून अनुदान शासनाकडून मिळणार आहे. आणि या केंद्र सरकारच्या (Of the Central Government) यंत्रणेबाबत महावितरणसाठी २५ मेगावॅट मंजूर झालेला आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी, माहिती घेऊन घरगुती ग्राहकांसाठी या योजनेचा लाभ मिळण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाला (Regional Office) लवकरात लवकर मदत ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी निर्देश दिला आहे. या योजनेने ग्राहकांची भरपूर प्रमाणात बचत होणार आहे. नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाच्या शेवट वीज विकत (Buy electricity) घेतली जाणार आहे.

वाचा : पूर परिस्थितीची लक्षणे: मुसळधार पावसाने घातला धमाकुळ, पुढचे 3 दिवस ‘या’ ठिकाणी पावसाचा जोर..

अनुदान –

केंद्र शासनाकडून या योजनेसाठी ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेचे वित्त सहाय्य, छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा (Rooftop solar power generation system) बसवण्यासाठी देण्यात येणार आहे

1) १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के
2) ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार.
3) सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत, प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेत गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांसाठी २० टक्के अनुदान मिळणार आहे.

या यंत्रणा व योजनेनुसार विजबिलातून प्रत्येक महिना ५५० रुपयाने ग्राहकांची बचत होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणने आव्हान केले आहे.

वाचा : पुढचे 5 दिवस “या” पिकांची अशी घ्या काळजी; अन्यथा नुकसानास बळी पडाल..

वाचा : शेतजमिनीच्या 7/12 मध्ये झाले हे मोठे 11 बदल, जाणून घ्या कोणकोणते बदल केले आहेत.

अर्ज कसा करावा-
www.mahadiscom.in महावितरणाच्या या वेबसाईटवर अर्ज करा.

प्रति किलोवॅट एवढी रक्कम जाहीर – रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी 5 वर्षाचा खर्च पकडून..

1) १ किलोवॅट- ४६,८२०
2) १ ते २ किलोवॅट- ४२,४७०
3) २ ते ३ किलोवॅट- ४१,३८०
4) ३ ते १० किलोवॅट- ४०,२९०

या सोबत १० ते १०० किलोवॅटसाठी ३७,०२० रुपये प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे.

उदा. ३ किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची १ लाख २४ हजार १४० रुपये व त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे ४९ हजार ६५६ रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल. आता ग्राहकास फक्त ७४ हजार ४८४ रुपयांचा खर्च करावा लागेल. यामध्ये 40% अनुदान मिळाल्यामुळे ग्राहकांची बचत होणार. त्या बरोबर या अनुदानाचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button