राज्यात “या” ठिकाणी ४ दिवस जोरदार पाऊस; पहा “ती” ठिकाणे कोणती?
4 days of heavy rain in "Ya" place in the state; See what "she" places?
उद्यापासून महाराष्ट्रामध्ये ४ ते ५ दिवस चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने (Meteorological Department) सांगितले आहे. सध्या पिकाच्या लागवडी सुरू झालेल्या आहेत. मुग उडीद काढणीला सुरुवात झाली आहे. नव्या पिकाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे आता शेतकरी चिंता दूर होताना दिसणार आहे.पूर परिस्थिती (Flood situation) अतिवृष्टी यानंतर शेतकऱ्यांच्या पिकांची पुन्हा लागवडी होणार आहेत. चांगले उत्पादन काढण्यासाठी चांगल्या पावसाची देखील तितकीच गरज असते. आपण पावसाची ठिकाणे सविस्तर पाहूया..
काल २९ ऑगस्ट २०२१ रोजी हवामान विभागाच्या माध्यमातून येत्या ४ ते ५ दिवसाचा हवामान अंदाज सादर केलेला आहे. खालीलप्रमाणे..
३० ऑगस्ट २०२१ रोजी कोकण गोवा मध्ये बहुतांश पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तर विदर्भ मध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता यामध्ये गडचिरोली गोंदिया , पूर्व विदर्भामध्ये याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
व्यावसायिकांसाठी मोठी बातमी: फेसबुक देणार कमी व्याजदराने 50 लाखांपर्यंत कर्ज; पहा सविस्तर
आपल्या जमिनीमध्ये कीडनाशके आहेत का? फक्त 7 रुपयामध्ये सांगणार “हे” नवीन तंत्रज्ञान..
३१ ऑगस्ट 2021 मध्ये कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्ये बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता यामध्ये सोलापूर , सांगली, सातारा आणि पुण्याचा दक्षिणेकडील भाग या भागामध्ये आतिशय जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक मध्येही अतिशय जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तसेच विदर्भ बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१ सप्टेंबरमध्ये २०२१ कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्ये बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तसेच विदर्भ बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२ सप्टेंबर २०२१ बहुतांश पाऊस पडण्याची शक्यता, मध्य महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भ मध्ये बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. यवतमाळ, अमरावती, बुलढाणा अकोल्याचा काही भाग या भागामध्ये अतिशय चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा-