कृषी बातम्या

Crop Insurance | ब्रेकींग! ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल 375 कोटींचे वितरण

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतीतील (Agriculture) पिकांचे नुकसान झाले आहे. याच झालेल्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Financial) आर्थिक दिलासा देण्यासाठी पिक विमा (Crop Insurance) कंपनीकडून 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Department of Agriculture) पिक विम्याचे वाटप करण्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

वाचा:चढ की उतार काय आहे आज सोयाबीनचा भाव; एका क्लिकवर जाणून घ्या कसा राहील यंदा बाजारभाव?

तब्बल कोट्यवधींचा निधी वाटप
सध्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून (Bank) सरकारच्या भरपाईचे वाटप सुरू आहे. त्याचवेळी जिल्हा बँकेला प्राप्त झालेल्या तब्बल 691 कोटी 15 लाख या निधीपैकी 2 लाख 50 हजार शेतकऱ्यांना (Department of Agriculture) एटीएम आणि शाखेमार्फत 375 कोटी 30 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे उपसरव्यवस्थापक मारोतराव शिंदे यांनी दिली आहे.

नादचखुळा! एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसाठी घेतले एकापेक्षा एक धडाकेबाज निर्णय; थेट शेतकऱ्यांचं बदलणार नशीब

वाचा: तूर उत्पादकांची चांदी! आयात वाढूनही यंदा बाजारात तूर राहणार तेजीत, जाणून घ्या कसा मिळेल भाव?

किती झाले नुकसान?
नांदेड जिल्यातील जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मूग या पाच लाख 27 हजार 141 हेक्टरवरील पिकांसह 314 हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले होते. तर 66 हेक्टरवरील फळपिके एकूण पाच लाख 27 हजार 491 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Distribution of 375 crores to the affected farmers of district

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button