ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने केली अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘इतक्या’ कोटींची तरतूद

यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) दिलासा देण्यासाठी निर्णय घेऊन मदतीचा हात पुढे केला. शेतकऱ्यांना शेती (Department of Agriculture) पिकांसाठी नुकसान भरपाई देण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी (Agriculture) दिलासादायक निर्णय घेतला आहे.

वाचा: महत्वाची बातमी! ‘या’ सरकारी योजनेंतर्गत मिळतंय 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, त्वरित घ्या लाभ

अतिवृष्टीकृष्ठांसाठी केली कोट्यवधींची तरतूद
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे आणि फडणवीस सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 3 हजार 600 कोटींची तरतूद केली आहे. राज्य शासनाने ही तरतूद अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव वाढीव मदत देण्यासाठी केली आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Insurance) दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून जमीनधारक शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 30 हजार, जाणून घ्या सविस्तर..

वाचा: बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना विहिरींसाठी ‘इतक्या’ लाखांचं वाढीव अनुदान, शासनाकडून अंतिम मान्यतेचे ‘बीडीओ’ना अधिकार

काय करण्यात आल्या आहेत तरतुदी?
• कापूस, सोयाबीन व इतर तेलबियांची उत्पादकता वाढ आणि मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृषी योजनेसाठी तब्बल 145 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.
• बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या बाह्य हिश्श्यासाठी 23 कोटी 80 लाख तर राज्य हिश्श्यापोटी 102 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ब्रेकींग! गायरान जमिन अतिक्रमणाबाबत हायकोर्टाचा दिलासादायक निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत स्थगिती

वाचा: तुरीचे दर शेतकऱ्यांवर अवलंबून! जाणून घ्या किती मिळतोय दर आणि कधी करावी विक्री?

• बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
• कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रलंबित कांदा अनुदान देण्यासाठी सात कोटी 47 लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.
• शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक कर्जासाठी एक टक्का व्याजदराने अर्थसाहाय्य देण्याकरिता 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! On the very first day of the winter session, the Shinde-Fadnavis government made a provision of crores for the victims of heavy rains.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button