तब्बल ३०० च मायलेज: पेट्रोल-डिझेल पासून सुटका, सर्वसामान्यांना देखील परवडणारी आली इलेक्ट्रॉनिक कार..
300 Mileage: Get Rid of Petrol-Diesel, Affordable Electronic Car ..
टाटा मोटर्स या कंपनीने 18 ऑगस्टल कारची माहिती सांगितली होती. पेट्रोल-डिझेल (Petrol-diesel) महागाईमुळे ग्राहकांची या इलेक्ट्रिक (Electronic) कारकडे मोठया प्रमाणात कल जाणवतोय. टाटा मोटर्सने कार ची झलक 18 ऑगस्ट ला दाखवली होती. आता त्यांनी ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. येणाऱ्या ३१ ऑगस्टला भारतात नवीन Tata Tigor Electric कार लाँच करणार असल्याचे सांगितले आहे.
आणि या Tata Tigor EV च्या बुकिंगलाही सुरुवात देखील झाली आहे. 21 हजार रुपयांच्या टोकण आमाउंट देऊन कंपनीच्या वेबसाईटवर वरून बुक करू शकता.
चार्जिंगची क्षमता-
ही कार एकदा चार्ज जवळपास 300 km पेक्षा जास्त मायलेज देणार असल्याचे सांगितले आहे. Tata Tigor EV ने सोशल मीडिया वर फोटो शेअर केले होते त्यामध्ये इंस्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये स्पष्ट दिसत आहे की 49 बॅटरी शिल्लक राहिली तर 204 किलोमीटर ही कार प्रवास करू शकणार आहे.
वाचा : मध्यम वर्गीय शेतकरीही होणार कार चा मालक ! शेतकऱ्याला मिळणार कमी व्याजदराने टाटा कार..
8 वर्षांची गॅरंटी-
टाटा मोटर्स ही कंपनी जवळपास ८ वर्षापर्यंत व 1 लाख 60 हजार किलोमीटर पर्यंत बॅटरीवर वॉरंटी देत असल्याचे सांगितले. फास्ट चार्जिंगसाठी कार मधील बॅटरी वापरली तर 1 तासात 80 टक्के होईल. आणि घरी चार्जिंग करायची म्हणलं तर जवळपास 8,9 तास वेळ लागत असल्याचे सांगितले आहे. Tata Tigor EV ही कंपनी भारतातील दुसरी प्रवाह वाहन सेगमेंट मधील कार आहे.
वाचा : स्वातंत्रदिन निमित्त स्वतःच्या घराचे स्वप्न होणार साकार होम लोन वर विशेष ऑफर…
कारचे फीचर्स –
ही कार इलेक्ट्रॉनिक असल्याने केबिनमध्ये निळ्या अॅक्सेंटचा वापर करण्यात आला आहे. हेडलॅम्प्सच्या आत आणि 15-इंचाच्या अलॉय व्हील्सवरही ब्लू हायलाइट्स आहेत. या बरोबर Tigor EV मध्ये अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा सपोर्ट असलेली 7.०-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, 4-स्पीकर, iRA कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, मल्टी-फंक्शन स्टीअरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर तसेच सेफ्टीसाठी या कारमध्ये ड्युअल एअरबॅग, EBD -ABS, रिअर पार्किंग सेन्सर, रिअर पार्किंग कॅमेरा, सीट बेल्ट रिमाइंडर असे अनेक फीचर्स आहेत.
कारची किंमत –
Tigor EV 10 ते 12 लाख रुपयांमध्ये लाँच होणार असल्याचा अंदाज बांधला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :