हवामान

राज्यात 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस; पहा “ती” ठिकाणे कोणती..

येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता (Chance of torrential rain) हवामान खात्याने (By the weather department) वर्तवली आहे. ३ ते ४ दिवसात जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार (Torrential to very torrential) पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस मोठ्या प्रमाणात असणार आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये (In the districts) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाटाच्या भागातही पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

परभणी जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस –

जिल्ह्यात (In the district) पावसाने सरासरी ओलांडली असून 1 जुनपासून आजपर्यंतच्या अपेक्षित पर्जन्यमानाशी (With rain) तुलना करून १३४.१ टक्के पाऊस झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या (Of the district administration) वतीने देण्यात आली आहे.

“या” ठिकाणी 21 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस

२१ सप्टेबरनंतर पुन्हा राज्यात (In the state) पावसाची सुरवात होणार असल्याचा अंदाज सांगितला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यासह कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्रात, मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये १५ सप्टेबरपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता अंदाज वर्तवली आहे. १६ ते २० सप्टेंबर दरम्यान सूर्यदर्शन होणार असल्याचे सांगितले आहे.

कोकण पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट –

हवामान खात्याने (By the weather department) आज पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर ऑरेंज अ‌लर्ट दिला. तसेच मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना (Districts) देखील यलो अ‌लर्ट (Yellow alert) दिला आहे.

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा –

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीने हवामानाचा अंदाज (Weather forecast) सांगितला आहे. पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना (To various districts) ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामानतज्ज्ञ (Meteorologist) के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिलेली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button