ताज्या बातम्या

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना तातडीने 25 टक्के अग्रिम पीक नुकसान भरपाई देण्याचे निर्देश

Good news for farmers! Directed to pay 25 percent advance crop loss compensation to farmers immediately

Crop Insurance | जळगाव जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामात पिकांना नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 27 महसूल मंडळांमधील पात्र शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील 27 महसूल मंडळांतील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मका, कापूस आणि सोयाबीन या पिकांची पेरणी केली होती.

शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देश
मात्र, पावसाचा खंड पडल्याने या पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी गुरुवारी अल्पबचत भवन येथे कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. या यादीची पडताळणी करून शेतकऱ्यांना लवकरच अग्रिम नुकसान भरपाई देण्यात येईल.

वाचा : Crop Insurance | अर्रर्र..! कापसाला अग्रिम नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीचा नकार; ‘या’ पिकांसाठी दर्शवली तयारी

विमा कंपन्यांनी व्याजासह नुकसान भरपाई द्यावी
यासोबतच, पंतप्रधान पीक विमा योजनेत मागील भरपाई देणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही पीक विमा कंपन्यांनी व्याजासह नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा काहीसा तोटा भरून काढता येईल.

हेही वाचा :

Web Title: Good news for farmers! Directed to pay 25 percent advance crop loss compensation to farmers immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button