Crop Insurance | शेतकऱ्यांच्या खात्यावर 200 कोटींचा पीक विमा जमा, जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
खरीप पिक विमा 2020 चे नुकसान भरपाईपोटी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 200 कोटी रुपयांचा पिक विमा क्रेडिट केला जाणार आहे.
Crop Insurance | यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून पिक विमा कंपनीला (Crop insurance company) आदेशही देण्यात आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad District 2020) 2020 चा पिक विमा याचिका निकालात काढताना कोर्टाच्या माध्यमातून 531 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर (Compensation approved) करण्यात आली होती. यानंतर 200 कोटी रुपयांचे वाटप केले जात आहे. या पीक विम्याचा आणि इतर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील (Maharashtra) इतर नुकसान ग्रस्त झालेल्या आणि अद्याप पीक विमा (Crop insurance) न मिळालेल्या जिल्ह्याचा काय संबंध आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोर्टात करण्यात आली याचिका दाखल
2020 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी पिक विमा कंपनीच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती. यासाठी उस्मानाबाद याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल लागला आणि निकालांमध्ये 531 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करून 6 आठवड्यांच्या आत पिक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा राज्य शासनाकडून ही नुकसानभरपाई वसूल केली जाईल अशा प्रकारच्या आदेश कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आले होते.
वाचा: Crop Insurance | शेतकऱ्यांनो पीक विमा योजनेचा लाभ हवाय? तर ‘या’ गोष्टींची खात्री कराच…
राज्य शासनाकडून नुकसान भरपाई
परंतु, निकाल लागल्यानंतरही यामध्ये कोणतीही हालचाल करण्यात नाही. राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारचा दबाव आणला गेला नाही. अखेर शेतकऱ्यांच्या माध्यमातून सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करावा अशा प्रकारचे आदेश कोर्टाने दिले आहेत. 2020 मध्ये पूर्ण महाराष्ट्रमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालं होते. साधारण 1 हजार कोटी रुपयांचे नुकसान भरपाईही राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आली होती.
वाचा: Yojana | ‘या’ समाजातील महिलांसाठी महिला स्वयंसिद्धी योजनेला मंजुरी, जाणून घ्या योजना आणि पात्रता
शेतकऱ्यांना 200 कोटींचा पीक विमा होणार वाटप
उस्मानाबाद जिल्ह्यातील 2020 चा पिक विमा याचिका निकालात काढताना कोर्टाच्या माध्यमातून 531 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. ज्यापैकी आता शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. पात्र शेतकरी 531 कोटी आहेत. मात्र 200 कोटी इतकाच पीक विमा वाटप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे हा पीक विमा मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे. हा पीक विमा वाटप झाल्यानंतर इतर जिल्ह्यांतील शेतकरी देखील पीक विम्याची याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: