शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनाचे ‘इतके’ कोटी वितरीत; - मी E-शेतकरी
योजना

Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनाचे ‘इतके’ कोटी वितरीत; त्वरित तपासा खात्यात पैसे आले का?

Yojana | शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याचा साठा प्रचंड महत्त्वाचा असतो. त्यासोबतच शेतीतील (Agriculture) पिकाला पाणी देण्यासाठी सिंचनाची गरज भासते. परंतु सिंचनाचा आर्थिक (Financial) खर्च शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नसतो. याच कारणास्तव शेतकऱ्यांना अनुदान (Subsidy) दिले जाते. आता सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना (Department of Agriculture) कोट्यवधींचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

वाचा: कापसाच्या दरात वाढ! मात्र सर्वच शेतकऱ्यांना मिळतोय का लाभ? जाणून घ्या सविस्तर

कोट्यावधींचा निधी वितरीत
आता सूक्ष्म सिंचनासाठी (Micro Irrigation Subsidy) अमरावती विभागाकरता 5 जिल्ह्यांत तब्बल 112 कोटी 51 लाख 73 हजार 526 रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय. अमरावती विभागामध्ये अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी (Agricultural Information) मोठ्या प्रमाणात सिंचनाचा वापर करत आहेत.

वाचा: बिग ब्रेकींग! शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांचा वीज कापणीबद्दल मोठा निर्णय; दिले महत्वाचे निर्देश

किती शेतकऱ्यांना मिळणार अनुदान?
खर तर, 2020 आणि 2021 या वर्षामध्ये 5 जिल्ह्यांतून जवळपास 18 हजार 566 शेतकऱ्यांनी या सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत (Micro Irrigation Scheme) अनुदानासाठी अर्ज केले होते. ज्यातील आता 18 हजार 514 शेतकऱ्यांना या योजनेंर्गत अनुदान मंजूर झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी (Type of Agriculture) आता तब्बल 27 कोटी 61 लाख 95 हजार 387 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! crores of micro-irrigation distributed; Quick Check Did the money arrive in the account?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button