“या” जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी 11 हजार अर्ज; लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची केली जाणार निवड, पहा बंपर ऑफर..
11,000 applications for rabbi season in "Ya" district; Beneficiaries will be selected by lottery method, see bumper offer.
कृषी विभागाने (Department of Agriculture) शेतकऱ्यांना महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. रब्बी हंगामातील विविध घटकांचा फायदा शेतकऱ्यांना (farmers) घेता येणार असल्याचे सांगितले आहे. या पोर्टलवर ११ हजार १४१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याची जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी (Agriculture Officer) यांनी माहिती दिली आहे.
वाचा- केंद्रसरकारने “या” डाळींच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय; पहा निर्णयाबद्दल सविस्तर माहिती…
इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी (mahadbt) प्रणालीद्वारे ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत अर्ज महाडीबीटी (Application Mahadbt) पोर्टलवर करावे अशा सूचना कृषी विभागाने ( Department of Agriculture) केल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्न-धान्य पिके व गळीतधान्य २०२१-२२ अंतर्गत रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्याक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन सुविधा (Irrigation facility) साधणे या बाबींचा समावेश होता.
वाचा – या शेतकऱ्याने पिकवली भाजीपाल्यांची अनोखी शेती; तेही फक्त दोन बाय चार फुटात..
ज्वारी, सुर्यफुलासाठी एकूण अर्ज –
शेतकरी गटामार्फत पीक प्रात्याक्षिके राबविले जाणार आहेत. यासाठी कृषी (Agriculture) सहायकांशी संपर्क साधून १० हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले होते. यानुसार जिल्ह्यातील ११ हजार १४१ शेतकऱ्यांनी (farmers) मुदतीत अर्ज सादर केले आहेत. यात प्रमाणित बियाणे वितरण घटकातंर्गत हरभऱ्यासाठी ६ हजार ८३६, ज्वारीसाठी ७१४, सूर्यफूल २१४ असे एकूण सात हजार ७६४ अर्ज दाखल झाले आहेत.
3 हजारांच्या वर अर्ज दाखल –
पीक प्रात्याक्षिक (Crop demonstration) घटकातंर्गत हरभऱ्यासाठी दोन हजार ६६५, ज्वारी ३६४, सूर्यफूल ३४८ अशा एकूण तीन हजार ३७७ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात लाभार्थ्यांची निवड लॉटरी (Lottery) पद्धतीने होणार आहे. यानंतर पात्र शेतकऱ्यांना पूर्व संमती देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा –
- सोयाबीन पिकावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव; नियंत्रण कसे कराल? वाचा सविस्तर माहिती..
- ड्रोनचा वापर करून शेतकरी शेतीमध्ये काढू शकतात अधिक उत्पन्न; ते कसे? जाणून घ्या सविस्तर..
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..