शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यात प्रथमच सुरू झाली ही “समिती ” पहा, काय उद्दिष्ट आहे या समितीचे.
Look at this "committee" which was started for the first time in the state to increase the participation of farmers, what is the purpose of this committee.
गावपातळीवरच शेतीचे नियोजन व्हावे, तसेच शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, याकरता ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. या समितीमध्ये गाव पातळीतील लोकप्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी व कर्मचारी या सर्वांचा समावेश असणार आहे.
येत्या खरीप हंगामाच्या नियोजनासाठी दादाजी भुसे यांनी घेतलेल्या आढाव्यात ही माहिती दिली. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जमीन सुपिकता निर्देशांक फलक बसवले आहेत, व त्याच्यानुसार रासायनिक खताचा वापर केल्यास खतांमध्ये दहा टक्के बचत होते. कृषी विभागाचे विविध कार्यक्रम राबवणे, तसेच “विकेल तेच पिकेल” या संकल्पनेवर कृषी चे आयोजन करणे हे या ग्राम कृषी विकास समितीचे उद्दिष्ट आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे व औषधे तसेच या दरम्यान होणारी वाहतूक या साऱ्या अडचणी सोडवून याकरता “कृषी आयुक्त स्तरावर नियंत्रण” कक्षाची स्थापना केली जाणार आहे. रासायनिक खताच्या असंतुलित वापरास प्रोत्साहन देण्यासाठी कंपन्यांना जिल्ह्यांनी निहायत जबाबदारी देणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी सांगितली.
खताच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता युरियाची मागणी वाढू शकते, त्यासाठी युरिया खताचा तुटवडा भासू नये म्हणून बफर स्टॉक ची निर्मिती करावी राज्यामध्ये रासायनिक खताची विक्री ही जुन्या दराने होईल असे कृषी विभागाने सुनिश्चित करावे.
पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करून नवीन ग्राहकांची मागणी असलेल्या पिकांचे क्षेत्र वाढवण्याचे आव्हान त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.
हे ही वाचा
1 उन्हाळ्यात फळबागेची ‘ घ्या’ अशी काळजी व करा या उपाययोजना
https://mieshetkari.com/take-care-of-the-orchard-in-summer-and-take-these-measures/
2 जमिनीतील उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकण्यासाठी आच्छादनाचा कसा उपयोग करावा.
https://mieshetkari.com/how-to-use-mulch-to-keep-the-available-soil-moisture-for-a-long-time/