तुम्हाला माहित आहे का? ‘ट्रॅक्टर’ ची पुढील चाके मोठी व मागील चाके का लहान असतात? जाणून घ्या याविषयी माहिती…
You know what Why are the front wheels of the tractor big and the rear wheels small? Learn more
आज-काल गावागावांमध्ये आपण ट्रॅक्टर (Tractor) पाहतो, ट्रॅक्टरच्या साह्याने अनेक शेतीची कामे सोपी होतात परंतु याचा कधी विचार केला आहे का ट्रॅक्टर ची पुढची चाकी मोठी व मागची चाकी का लहान असतात. (Why are the front wheels of the tractor bigger and the rear wheels smaller?) याविषयी आपण जाणून घेऊया.
चार चाकी गाडीचे इंजिन व ट्रॅक्टर चे इंजिन (Tractor engine) सारखेच असते,ट्रॅक्टरचं इंजिन जास्त टॉर्क म्हणजेच ट्रॅक्शन (Traction) तयार करतं. याच ‘ट्रॅक्शनवरुन’ त्याला ‘ट्रॅक्टर ‘ (‘Tractor) हा शब्द मिळाला आहे. ट्रॅक्शन चा मराठी अर्थ होतो ओढणे.
हेही वाचा : मोटर पंप चालू व बंद करण्याचा टेन्शन सोडा! आजच लावा “मोबी पंप”; जाणून घ्या Mobi Pump विषयी संपूर्ण माहिती…
ट्रॅक्टर ची कामे हे डांबरी रस्त्यावर नसून शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात, ट्रॅक्टर ला चिखल माती मध्ये मोठ्या प्रमाणात काम करावे लागते.त्यामुळे, चिखलात चाकं रुतू नये आणि सहजगतीने कामं व्हावी यासाठी ट्रॅक्टरची मागची चाकं मोठी असतात. कुठलीही गोष्ट ओठताना, ही मागची चाकं ट्रॅक्टरला स्थिरतेसोबत जमीनवर पकड मिळवून देतात, त्यामुळे ट्रॅक्टरचं इंजिन जरी कमी क्षमतेचं (Low capacity)असलं, तरी त्याची ताकद ही मात्र जास्त असते.
हे ही वाचा : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कोरोनाच्या काळात करा; असे घरगुती छोटे उपाय….
ट्रॅक्टरचे पुढील चाके दिशा देण्याचे काम करतात, तसेच पुढील चाके लहान असल्याकारणाने ट्रॅक्टर वळवणे देखील सोपे जाते.मागच्या चाकांचं वजन प्रचंड असतं, त्यात ट्रॅक्टरचं इंजिन हे पुढं असतं, त्यामुळे संतुलन ठेवण्यासाठी पुढं छोटी चाकं लावली जातात.
हे ही वाचा :
1)वेडीवाकडी असणारे आले अंत:रंगाने किती आहेत बहुगुणी? वाचा’ हे ‘आल्याचे’ गुणधर्म:
2)सोयाबीनच्या ” ह्या ” आहेत नवीन विकसित जाती पहा या जातींची काय वैशिष्ट्ये आहेत.