कृषी बातम्या
ट्रेंडिंग

शेतकऱ्यांसाठी खूषखबर : ‘पीएम किसान सन्मान’ योजनेच्या 9 व्या हप्त्याची रक्कम येणार ‘या’ तारखेला वाचा सविस्तर बातमी…

कृषी पाणी खुषखबर: 'पीएम गझल सन्मान' तपासणी 9 व्या व्यासपीठावर होणा-या 'ताराला वाच सविस्तर बातमी…

पंतप्रधान किसान सन्मान (Prime Minister Kisan Sanman) योजनेला तीस महिने पूर्ण झाले असून, मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काढलेली सर्वात यशस्वी योजना म्हणून पाहिले जाते. केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार (State Government) शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत असतात त्यातील एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान योजना ही होय.

या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये (Six thousand rupees) दिले जातात. या योजनेतील 9 व्या हप्त्याचे (9th Installment) प्रत्येकी 2 हजार रुपये पुढील महिन्या म्हणजेच 31 जुलै नंतर शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा होणार आहेत.

पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!

पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंद केली आहे, त्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांच्या बँकेतील अकाउंटवर (On a bank account) दोन हजार रुपये येणार आहे.

कोण होणार या योजनेस पात्र : (Who will be eligible for this scheme) ज्यांची स्वतः च्या नावे जमीन आहे असे शेतकरी.

‘अशा’ रीतीने करा कांद्याची साठवण; होणार नाही दोन वर्ष कांदा खराब !

कोण आहेत अपात्र? (Who are ineligible?)

  • असे शेतकरी कुटुंब ज्यामधील एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पुढील श्रेणीत येतात- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी
  • घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष हे सर्व या योजनेच्या बाहेर आहेत.
  • केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून)
  • केंद्र आणि राज्य सरकारमधील 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतीला देखील याचा लाभ नाही.

टेक्निकल गुरु: बाजारात आला आहे, “होंडाचा पावर टिलर” वाचा; उपयोग आणि वैशिष्ट्य…

  • मागच्या वर्षी आयकर भरणारे शेतकरी योजनेच्या फायदा मिळणार नाही.
  • तुम्ही दुसऱ्याची जमिन भाड्याने घेऊन कसत असाल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही
  • नोंदणी प्रक्रियेत मुद्दाम चूक करणाऱ्यांना देखील फायद्यापासून वंचित राहावं लागेल.
  • काही अडचण असल्यास शेतकरी थेट मंत्रालयाशी संपर्क करू शकतात. (Farmers can contact the ministry directly if there is any problem.)
  • पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
  • पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक : 155261

हे ही वाचा :

1. पेट्रोल दरवढीला लिक्विफाईड नॅचरल गॅस उत्तम पर्याय होणार का? जाणून घ्या नितीन गडकरी यांचे वक्तव्य..

2. आत्ता येणार शेतकरी कायदा! ‘शेतकऱ्याची फसवणूक’ केल्यास होणार दंड व तीन वर्षाचा तुरुंगवास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button