आधार कार्ड हरवले आहे …. ! आता काळजी करण्याचे कारण नाही….फक्त दोन मिनिटात करा डाउनलोड…
आजकाल कोणत्याही वयक्तिक कामासाठी आधार कार्ड हे अत्यंत गरजेचे आहे . नविन सिम कार्ड असो व नवीन बँक खाते, सरकारी काम ,नवीन घर घेणे, स्वस्त धान्य घेणे, स्वतःची ओळख पटविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आधार कार्डची अत्यंत गरज आहे.
धकाधकीच्या जीवनात आधार कार्ड निष्काळजीपणाने हरवल्यास आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपण UIDAI च्या website वरून काही मिनिटात आधार कार्ड ची पीडीएफ किंवा डिजिटल कॉपी आपण डाउनलोड करू शकतो .
आधार कार्ड ची पीडीएफ कॉपी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आधार नंबर ,एनरोलमेंट आयडी किंवा वर्चुअल आयडी एकाची गरज आहे. त्यासोबत आपल्या मोबाइलला नंबर लिंक असणे गरजेचे आहे .
आधार कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या…
1 .आपल्याला अगोदर UIDAI च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागते (https://UIDAI.giv.in) वर जावे.
2. तेथे my adhar सेक्शन वर क्लिक करावे .
आपल्याला गेट आधार टॅबच्या अंतर्गत download adhar च्य option वर क्लीक करावे .
येथे आधार नंबर व एनरोलमेंट आयडी किंवा व्हर्चुअल आयडी यामधून कोणताही एक पर्याय भरावा. आणि त्यासोबत कॅप्चर कोड टाकावा
3. त्यानंतर send OTP वर क्लिक करा .
4. त्यानंतर आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर आलेला OTP टाकावा.
5. त्यानंतर एक सर्वें आपल्या समोर येईल ,त्यामध्ये भाग घ्या आणि त्यानंतर verify आणि डाउनलोड च्या लिंकवर क्लिक करावे .
6. यानंतर आपला e -adhar डाउनलोड होईल .
e- aadhar एक पासवर्ड प्रोटेक्टड फाइल होते .येथे पासवर्ड बद्दल आपल्या नावाचे चार अक्षर (इंग्रजी ब्लॉक लेटर) मध्ये टाकावे . आणि जन्माचे वर्ष एंटर करावे लागेल .