ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला
ट्रेंडिंग

अतिवृष्टी नुकसान भारपाईचा 2 हजार 489 कोटी रुपयांचा निधी वितरित; सविस्तर वाचा …

महाराष्ट्र राज्यात जुन ते ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम काही, ठिकाणी सरकारने दिली आहे. तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे.

शेतकऱ्यांचे पुरामुळे झालेले नुकसान, मनुष्यहानी, मत्स्यव्यवसायाचे नुकसान, घर पडझड सानुग्रह अनुदान यासाठी सरकारने 9 नोव्हेंबर 2020 च्या शासन निर्णया नुसार 2 हजार 197 कोटी तर 7 जानेवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार शेती पिकांच्या नुकसानी बाबत 2 हजार 192 कोटी असे एकूण 4 हजार 489 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.

निधी वाटपाचे काम सुरु असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची निधी 545 कोटी वितरित करण्यात आला आहे. या निधी वाटपाचे काम सुरु असून ज्या लाभार्थ्यांना निधी मिळालेला नाही अश्याना लवकरात लवकर निधी मिळणार आहे.

WEB TITLE: Distributed funds of Rs 2,489 crore to compensate for excess rain damage; Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button